CM-will-appear-in-the-web-series

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनावर आधारित एका वेब सीरिजचा Web series दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीझनचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. लगेचच हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तरुणपणापासून आतापर्यंतच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन कलाकार त्यांची भूमिका साकारत आहेत. महेश ठाकूर, फैजल खान आणि आशिष शर्मा मोदींच्या भूमिकेत आहेत. या सीरिजचे दिग्दर्शक उमेश शुक्ला असून निर्माते आशिष वाघ, हितेश ठक्कर आणि उमेश शर्मा आहेत.

या वेब सीरिजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांची भूमिका दर्शन जरीवाला आणि आईची भूमिका प्राची शाह करत आहेत. या सीझनचा ट्रेलर देखील प्रेक्षकांची प्रशंसा मिळवत आहे. त्याचप्रमाणे महेश ठाकूर यांच्या भूमिकेचे देखील कौतुक होत आहे, जे पंतप्रधानांची सध्याची भूमिका निभावत आहेत. या सीझनच्या ट्रेलरची सुरुवात अशा डायलॉगने होते की, 'जो मेरे गुजरात को प्रेम करता है, वो मेरी आत्मा है और जो मेरे भारत को प्रेम करता है, वो मेरा परमात्मा है.'

इथे पाहा ट्रेलर-

याआधी बनला आहे पंतप्रधानांच्या आयुष्यावर सिनेमा

वेब सीरिजमध्ये गुजरातमधील दंगलीपासून भूकंपापर्यंतच्या विविध घटना दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील काही रिअल फुटेज देखील दाखवण्यात आले आहे.

Must Read 

1) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

3) 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनायाने शेअर केला साडीतला फोटो

4) Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा वधारलं सोनं,

5) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

6) युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल....

दरम्यान या सीरिजआधी एक बॉलिवूड सिनेमा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला होता. 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमात अभिनेता विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi) याने मोदींची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एवढी चांगली कमाई केली नव्हती.