Beating-the-rickshaw-puller

जबलपुरमधून एका धक्कादायक व्हिडीओ Video समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून देशातील क्रुरता वाढत असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका लोडिंग ऑटोने स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणीला मागून धडक दिली. यानंतर तरुणीने फोन करून आपल्या नातेवाईकांनी बोलावले. यानंतर आलेल्या तरुणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. यावेळी रिक्षाचालकाला तालिबानी पद्धतीने मारहाण करण्यात आली.

अनुराग द्वारी नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर Twitterशेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलं रिक्षाचालकाला बेदम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. त्यांनी तरुणाला खूप मारहाण केली व त्यानंतर त्याला दुचाकीच्या मागे आडवं बसवलं व त्याला घेऊन गेले. हे तरुण या भागातील गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. येथील प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडीओ शूट केला आहे.