Main Featured

शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक


BJP-leader-arrested

उत्तर प्रदेशमध्ये
 
Uttar Pradesh ६९ हजार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेदरम्यान पेपर फोडून फसवणूक करण्याच्या आरोपाखाली भाजपाचा नेता चंद्रमा सिंह यादव याला एसटीएफने सोमवारी प्रयागराजमधून अटक केली. शिक्षक भरती घोटळ्यामध्ये चंद्रमाने प्रमुख भूमिका बजावल्याचा आरोप आहे. चंद्रमा यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या परीक्षा केंद्रातून फसवणूक करणाऱ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप आहे. पाच महिन्यांपासून एसटीएफचे पथक चंद्रमाच्या मागावर होते. या घोटाळ्याच्याआधी चंद्रमा योगी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री 

Advertise

Cabinet Ministerपदावर होते. मात्र जानेवारी महिन्यामध्ये टीईटी परीक्षांसंदर्भातील घोटाळ्यांच्या प्रकरणात एसटीएफने अटक केल्यानंतर चंद्रमाला कॅबिनेट पदावरुन हटवण्यात आलं. उत्तर प्रदेशमधील भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यसमितीमध्येही चंद्रमा सदस्य होता. तर पक्षाच्या महानगरातील समितीमध्ये उपाध्यक्ष पदीही होता.

चंद्रमा यादवला अटक करण्यावरुन तपास करणारी उत्तर प्रदेशमधील एसटीएफ आणि सरकारमध्ये मतभेद होते. पाच महिन्यांपासून तपास सुरु असतानाही चंद्रमाला अटक करण्यात न आल्याचे एसटीएफवर टीका केली जात होती. अखेर एसटीएफच्या टीमच्या प्रयागराजमधील तुकडीने सोमवारी संध्याकाळी सिव्हील लाइन्स परिसरातील शहीद चंद्र शेखर आझाद पार्कसमोरील हिंदू हॉस्टेल चौकामध्ये चंद्रमाला अटक केली. एसटीएफ टीमला चंद्रमाजवळ मोबाइल फोन, आधार कार्ड आणि काही पैसेही सापडले. या सर्व वस्तू एसटीएफने ताब्यात घेतल्या आहेत. चंद्रमा यादव प्रयागराजमधील धूमनगंज येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये असणाऱ्या पंचम लाल आश्रम इंटर कॉलेचा संचालक आहे. या कॉलेजमध्ये एकूण २०० विद्यार्थी असून कॉलेजच्या इमारतीमध्ये केवळ १२ खोल्या आहेत.

यापूर्वीही चंद्रमा यादवला टीईटी परीक्षा घोटळ्यात अटक करण्यात आली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्रमा तुरुंगातून बाहेर आला होता. मात्र त्याचवेळी तत्कालीन एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांच्या निर्देशानुसार तपास केल्यानंतर सोरांव पोलीस स्थानकामध्ये ६९ हजार शिक्षकांच्या भरती परीक्षेतील घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आलं. या घोटाळ्यामध्ये डॉ. के. एल. पटेल. मायापति दुबे आणि ललितपति त्रिपाठी या तिघांबरोबरच चंद्रमा यादवचाही समावेश होता. प्रतापगढमधील राहुल सिंह या तरुणाने सोरांव पोलीस ्स्थानकामध्ये पाच जून रोजी एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी पोलिसांऐवजी एसटीएफच्या माध्यमातून करण्याची मागणी एसएसपींनी केली होती. याच प्रकरणामुळे तत्कालीन एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांची बदली करण्यात आल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

चंद्रमा यादव आपल्या ओळखीचा फायदा घेत स्वत:चं कॉलेज हे परीक्षा केंद्र असेल अशी व्यवस्था करायचा. परीक्षेच्या एक दिवस आधी येणाऱ्या प्रश्नपत्रिका तो पेपर फोडण्याचे काम करणाऱ्या टोळीचा प्रमुख असणाऱ्या डॉ. के. एल. पटेल आणि त्यांच्या माणसांपर्यंत पोहचवायचा. या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे शोधून ती ब्ल्यूटूथ आणि इतर इलेक्ट्रीक माध्यमांमधून परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जायची. यासाठी ही टोळी विद्यार्थ्यांकडून सहा ते सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम घ्यायचे. या प्रकरणामध्ये एकूण १८ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन जण विद्यार्थी असून इतर १५ जण हे टोळीतील सदस्य आहेत. पोलिसांनी यापैकी १५ जणांना अटक केली असून तीन जण अद्याप फरार आहेत. एसटीएफची टीम या फरार आरोपींचा शोध घेत आहे.