Auction-of-David-Ibrahim's-property

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम Dawood Ibrahimव त्याचा विश्वासू इक्बाल मिरची यांचा मालमत्तांचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट(सफेमा) अंतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया अडकली होती. पण आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

दाऊदच्या कुटुंबियांशी संबंधी

Advertise

रत्नागिरी जिल्ह्यातील
खेड येथे या मालमत्ता आहेत. त्याती सहा मालमत्ता मुम्बाके या गावात आहेत. त्यात 27 गुंठे जमीन, 29.30 गुंठे जमीन, 24.90 गुंठे जमीन, 20 गुंठे जमीन, 18 गुठे जमीन तसेच 27 गुठे जमिनीसह एक घर अशा सहा मालमत्ता आहेत. याशिवाय खेड परिरातच लोटे येथेही 30 गुंठ्यांची एक जागा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात लिलाव करण्यात येणार आहे. त्याच्या आठवड्याभरापूर्वी लीलावात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलावही करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सफेममार्फत या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी 45 लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन कॉ. हा.सो. मध्ये 501 व 502 हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ 1200 चौ.फुट आहे.

दाऊदच्या मालमत्ता व त्यांची किंमत
27 गुंठे जमीन- दोन लाख पाच हजार
29.30 गुंठे जमीन- दोन लाख 23 हजार
24.90 गुंठे जमीन-एक लाख 89 हजार
20 गुंठे जमीन-एक लाख 52 हजार रुपये
18 गुठे जमीन-एक लाख 38 हजार
27 गुठे जमिनीसह एक घर-61 लाख 48 हजार