Assassination-by-stabbing

Crime मिलिंद नगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून आज कोयत्याने वार करत हत्या the killing

Advertise

करण्यात आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी किरण भरम या आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. सुजित पाटील आणि किरण भरम हे दोघे एकाच परिसरात राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. याच वादातून आज सायंकाळी किरण भरम याने आपल्या साथीदारासह सुजित पाटील याला घराच्या परिसरात गाठत कोयत्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपी किरम भरम याला तात्काळ ताब्यात घेत पोलीस पुढील तपास करत आहेत.