इचलकरंजी येथील रिक्त झालेल्या पोलिस उपअधिक्षकपदी बाबुराव महामुनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. महामुनी हे उपविभागीय अधिकारी कोल्हापूर शहर पदावर कार्यरत होते.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

5) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

इचलकरंजी येथील पोलिस उपअधिक्षक या पदावर गणेश बिरादार हे कार्यरत होते. त्यांची मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड येथे बदली झाल्याने येथील पद रिक्त झाले होते. या पदावर कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. ती उत्सुकता आता संपली असून बाबुराव महामुनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच काही अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये  इचलकरंजीतील पोलिस उपअधिक्षकपदी महामुनी यांची नियुक्ती केली आहे.

पोलिस उपअधिक्षक म्हणून कार्यरत असताना गणेश बिरादार यांनी शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण केला होता. त्यांच्या कार्यकाळात शहरातील अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हाच वचक कायम ठेवण्याचे आव्हान नुतन पोलिस उपअधिक्षक महामुनी यांच्यासमोर असणार आहे.