Main Featured

‘अतरंगी रे’साठी अक्षय कुमारने घेतले 27 कोटी?


Akshay-Kumar-took-Rs-27-crore

अक्षय कुमार Akshay Kumarसध्या ‘अतरंगी रे’ या सिनेमासाठी घेतलेल्या मानधनामुळे चर्चेत आहे. होय, या सिनेमासाठी अक्षयने किती दिवस शूटींग केले तर फक्त दोन आठवडे आणि फी घेतली किती तर 27 कोटी.

अक्षयने या सिनेमासाठी 27 कोटी मानधन घेतल्याची चर्चा कदाचित तुम्ही याआधीही ऐकली असेल. पण यामागची स्टोरी कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी.
तर या मानधनाचा संबंध अक्षयच्या ‘लकी नंबर’शी आहे. होय, 9 हा आकडा अक्षय स्वत:साठी लकी मानतो. त्यामुळे अक्षय नेहमी याच आकड्यात मानधन घेतो.
आता कसे तर तर अक्षय कुमार साधारण एका दिवसाच्या शूटिंगसाठी साधारणत: 1 कोटी रुपये मानधन घेतो. मात्र यावेळी त्याने ही रक्कम जवळपास दुप्पट केली आहे. अक्षय कुमार 9 हा आकडा लकी मानतो. त्यामुळे मानधन सुद्धा तो याच आकड्याशी जुळणा-या संख्येने (2 +7 = 9) तो मानधन घेतो.
‘अतरंगी रे’ या सिनेमात सारा अली खान व साऊथ सुपरस्टार धनुष हे मुख्य भूमिकेत आहेत. आनंद एल राय यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
‘अतरंगी रे’च्या कथेबद्दल अद्याप फार माहिती मिळालेली नाही. मात्र यात अक्षय कॅमिओ रोलमध्ये असेल, असे मानले जातेय.
मिररच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात सारा अली खान डबलरोलमध्ये दिसू शकते. अक्षय व धनुष अशा दोघांसोबतही ऑनस्क्रीन रोमान्स करताना झळकू शकते.
2019 मध्ये अक्षयने अनेक सिनेमे रिलीज झालेत. यंदाही त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, बेल बॉटम, बच्चन पांडे, पृथ्वीराज शिवाय अतरंगी रे.
बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.