पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारने दोन्ही सभागृहामध्ये ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर केले आहे. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने  या कृषी विधेयकाला स्थगिती दिली आहे. या स्थगिती विरोधात इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत स्थगिती विधेयकाची होळी करण्यात आली.

मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात कृषी विधेयक बहुमताने मंजूर केले. सदर विधेयक शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. या ऐतिहासिक विधेयकाला देशातील इतर सर्व राज्यांनी मंजुरी दिली असताना शेतकर्‍यांप्रती बेगडी प्रेम असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेत त्याला स्थगिती दिली आहे. 

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी व्हावी यासाठी भाजपाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर स्थगिती विधेयकाची होळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, पुंडलिक जाधव, धोंडीराम जावळे, प्रसाद खोबरे आदी मान्यवरांची भाषणे झाली.

या आंदोलनास बाबासाहेब महाजन, राजाराम खोत, शहाजी भोसले, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, अमर कांबळे, विनोद कांकाणी, सतीश पंडित, भरत जोशी, राजेंद्र पाटील, सौ. पुनम जाधव, सौ. विजयाताई पाटील, सौ. अश्‍विनी कुबडगे, सुधीर पाटील, सतीश नर्मदे, राजकुमार पाटील, पांडुरंग म्हातुकडे, मिश्रीलाल जाजू, नगरसेवक अजित जाधव, वृषभ जैन आदींसह पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.