Main Featured

विनामास्क फिरणार्‍या तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍यांवर कारवाईचा बडगा


 

Action-will-be-taken-against-without-masksइचलकरंजी येथे शहर आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क(Without mask) फिरणार्‍या तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने 15 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीत विनामास्क फिरणार्‍या 1730 जणांवर कारवाई करुन 1 लाख 73 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदकुमार मोरे यांनी दिली.

Advertise

Must Read

1) बियर बारबाबत नवी नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

2) पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र

3) बॉलिवूड अभिनेत्रीला धमकी

4) मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेच्या साडीतील फोटोशूटमध्ये

5) डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयातून पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल

शहर आणि परिसरात समुह संसर्गातून कोरोनाचा कहर वाढत चालला होता. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरु असल्या तरी वारंवार सूचना करुनही मास्क न वापरणार्‍यांची संख्या अधिक होती. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आता प्रशासनासोबत पोलिसांनाही कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हॅण्डग्लोज न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे आदी विरुध्द पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली आहे.

या अंतर्गत शहर वाहतूक शाखेच्यावतीने ही मोहिम तीव्र करत दररोज दंडात्मक कारवाई सुरु केली. 15 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत 18 सप्टेंबर रोजी तब्बल 119 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी शासन नियमांचे पालन करुन स्वत:सह इतरांचेही संरक्षण करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.