इचलकरंजीत आज नव्याने एकच रूग्ण आढळून आला. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मथुरानगर परिसरातील एका नविन रूग्णाची नोंद झाली आहे. शहरात आज अखेर 3969 इतकी रूग्णांची संख्या झाली आहे. तर कोरोनावर मात करून 3767 जण घरी परतले आहेत. सध्या केवळ 8 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 194 जणांचा मृत्यू झाला आहे.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

5) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

इचलकरंजीत गेल्या काही दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र येत्या काही दिवसात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर शहरवासियांना कोरोना हद्दपार झाल्याच्या अर्विभावात न राहता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर, अनावश्यक गर्दीत न जाणे आदि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.