Main Featured

अजय देवगनच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर


A-mountain-of-grief-over-Devgan's-family

अभिनेता अजय देवगन Ajay Devgan याचं कुटुंब सध्या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहे. सारं जग एकिकडे कोरोनाशी लढा देत असतानाच इथं हे संकट शमत नाही, तोच अजयच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या परिस्थितीला सामोरं जात आणि भावना शब्दांवाटे व्यक्त करत खुद्द अजयनंच एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली. 

ट्विट करत अजयनं त्याच्या भावाच्या निधनाची माहिती दिली. अनिल देवगन यांच्या निधनामुळं आपण खचून गेलो आहोत, या शब्दांत त्यानं भावना व्यक्त केल्या. 'राजू चाचा' आणि 'ब्लॅकमेल' अशा चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल देवगन यांनी केलं होतं. त्याशिवाय अजच्याच सन ऑफ सरदार या चित्रपटासाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं होतं. 

Advertise

'काल रात्रीच मी भाऊ अनिल देवगन याला गमावलं. त्याच्या अकाली निधनानं आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरा बसला आहे. आम्ही मनातून खचलो आहोत', असं म्हणत आपल्याला त्याची अनुपस्थिती कायमच सतावेल असं अजय पोस्टमध्ये म्हणाला.

आपल्या भावाच्या चिरशांतीसाठी प्रार्थना करणाऱ्या अजयनं यावेळीच कोरोनाचं संकट पाहता कोणत्याही प्रकारची शोकसभा किंवा प्रार्थना सभा होणार नसल्याचंही जाहीर केलं. अजयनं त्याच्या भावाच्या निधनाबाबतची माहिती देताच चाहत्यांनीही सहानुभूतीपूर्व ट्विट करत त्याच्या कुटुंबाला आधार दिल्याचं पाहायला मिळालं.