5-inter-state-express-will-be-startedरेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्यांतर्गत पाच विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहेत. या गाड्या मुंबईहुन सुटून पुणे, नागपूर, गोंदिया आणि सोलापूर या शहरांच्या दरम्यान दररोज चालवण्यात येणार आहेत. नऊ ऑक्टोबरपासून या गाड्या नियमित धावतील.

Advertise

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील विविध शहरांना आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अनलॉक 5 च्या आदेशामध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतूक तात्काळ सुरू करावी, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. हे आदेश मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केले. हे प्रस्तााव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आले. रेल्वे बोर्डाने गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून पाच एक्सप्रेस चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. या एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दररोज सोडण्यात येतील.