11 lakh patients free from Kovid in the state

राज्यात गुरुवारी कोरोनाच्या (Corona) १६ हजार ४७६ रुग्णांचे निदान झाले असून, ३९४ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यात १४ लाख ९२२ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या ३७,०५६ झाली. दिवसभरात १६,१०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

MUST READ


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के असून, मृत्युदर २.६५ टक्के आहे. गुरुवारी नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे २, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा ६, पालघर १०, वसई-विरार मनपा ५, रायगड १४, पनवेल मनपा ३ आदी रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.