-all-new-aadhaar-pvc-cardआजच्या काळात आधार कार्ड अनेक मार्गांनी प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनला आहे. अनेक सरकारी योजनांपासून ते शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी आधार कार्ड (Aadhar Card) मागविले जाते. याशिवाय ओळखपत्रांसाठीही आधार कार्डचा वापर केला जातो. पूर्वी आधार कार्ड पोस्टद्वारे पाठविले जात असे. परंतु, आता आपणास नवीन अवतारात आधार कार्ड दिसणे सुरू होईल. या नव्या प्रकारच्या आधारविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता देखभाल दुरुस्तीसाठी ते सोयीचे होईल. आधार तयार करणारी संस्था यूआयडीएआय (UIDAIने याबाबत माहिती दिली आहे.

Advertise

  Must Read

युआयडीएआयने माहिती दिली आहे की, आता आधार कार्डला पॉलिव्हिनाईल क्लोराईड ( PVC) कार्डवर रीप्रिंट केले जाऊ शकते. हे कार्ड आपल्या एटीएम किंवा डेबिट कार्ड प्रमाणेच आपल्या वॉलेटमध्ये सहजपणे येईल. तसेच, ते खराब होण्याची चिंता राहणार नाही. यूआयडीएआयने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचा आधार आता सोयीस्कर आकारात असेल जो तुम्ही सहजपणे पाकीटात ठेवू शकता.’ या ट्विटमध्ये पुढे सांगण्यात आले की, आपण आपले आधार पीव्हीसी कार्ड मागवू शकता. हे टिकाऊ आहे, दिसण्यात आकर्षक आणि नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट समाविष्ट असेल.

दरम्यान, पीव्हीसी कार्ड पॉलीविनाईझ क्लोराईड कार्ड म्हणून ओळखले जाते. हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डची माहिती छापली जाते. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.

नवीन आधार पीव्हीसी कार्ड कसे मिळू शकेल?

1. यासाठी यूआयडीएआय वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

2. या संकेत स्थळावर ‘ My Aadhaar’ विभागात जाऊन ‘ Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करावे लागेल.

3. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा 12 डिजिटचा नंबर किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 डिजिटचा आधार एनरोलमेंट आयडी (ईआयडी) भरावा लागेल.

4. यानंतर तुम्हाला सुरक्षा कोड किंवा कॅप्चा भरावा लागेल.

5. ओटीपीसाठी Send OTP वर क्लिक करा.

6. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपीला देण्यात आलेली रिक्त जागा भरा आणि ती सबमिट करा.

7. सबमिशन केल्यानंतर आपल्याला आधार पीव्हीसी कार्डचा एक प्रीव्यू आपल्या समोर असेल.

8. यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला पेमेंट पृष्ठावर पाठविले जाईल. आपल्याला येथे 50 रुपये फी जमा करावी लागेल.

9. देय दिल्यानंतर, आपल्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.