इचलकरंजी येथे तीनशे युनिटपर्यंत वापर असणार्‍या घरगुती ग्राहकांची सहा महिन्यांची बिले माफ करावीत या मागणीसाठी गुरुवारी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने येथील महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर शिष्टमंडळाच्यावतीने कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांना निवेदन देण्यात आले.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

5) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली. गरीब, मध्यमवर्गीय व कष्टकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडल्याने दमछाक  झाली आहे. स्वस्त व मोफत धान्य वगळता केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात घरगुती वीज बिलात 50 टक्क्यांची सवलत दिली आहे. पण महाराष्ट्र राज्य सरकारने या संदर्भात अद्याप निर्णय केलेला नाही. त्यामुळे दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापर असणार्‍या घरगुती वीज ग्राहकांची सहा महिन्यांची बिले माफ करावीत, त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक रकमेची तरतूद करुन महावितरणला अनुदान स्वरूपात द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात नगरसेवक शशांक बावचकर, दत्ता माने, प्रसाद कुलकर्णी, सदा मलाबादे,  बजरंग लोणारी, प्रा. रमेश लवटे, गौस अत्तार, रावसाहेब कांबळे, संजय होगाडे, नाना पारडे, शरद कांबळे, उषा कांबळे, गणपती शिंदे, संजय टेके, महंमदइलियास समडोळे, विनायक चव्हाण यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते