Main Featured

मटका घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल : 34 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त


 

case-has-been-registeredइचलकरंजी येथे कल्याण मटका घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दीपक चंद्रकांत रावळ (वय 39 रा. तीनबत्ती चौक परिसर) यास अटक करण्यात आली आहे. तर नितीन बुगड (रा. हत्ती चौक) हा दिवाणजी व अतुल देशमाने (रा. संभाजी चौक) हा मटकाबुकी फरार आहेत. या कारवाईत 2800 रुपयांची रोकड, मोबाईल, मोपेड असा 34 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertise

Must Read

1) बियर बारबाबत नवी नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

2) पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र

3) बॉलिवूड अभिनेत्रीला धमकी

4) मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेच्या साडीतील फोटोशूटमध्ये

5) डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयातून पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हुलगेश्‍वरी रोड परिसरात कल्याण मटका घेतला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता रस्त्यावर अ‍ॅक्टिव्हा मोपेडवर दिपक रावळ हा कल्याण मटका घेताना सापडला. मटकाबुकी अतुल देशमाने याच्यासाठी मोबाईलवरुन मटका घेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तर नितीन बुगड हा दिवाणजी असल्याचे समोर आले आहे.