Main Featured

का दिली कंगनाला Y+ सुरक्षा : मिळालं खर कारण


                                      kangna Y+ scurity

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranautला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा पुरवल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला तर काहींनी टीकासुद्धा केली. तिला ही सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी सांगितलं. कंगनाच्या सुरक्षेबाबत तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

‘कंगना रणौत सोशल मीडियावर तिची मतं मांडत असल्याने महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. तिला  (Y + security: Got real reason) धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवण्यात यावी,’ अशा आशयाचं निवेदन कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला या परिस्थितीची कल्पना दिली, असं रेड्डी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. मात्र या सुरक्षेसाठी खर्च करण्यात येणारा पैसा कोण देणार याबाबत त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.

Must Read

कंगनाने मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर तिच्यातील आणि शिवसेनेतील वाद टिपेला पोहोचला. मुंबईत येऊ नकोस अशा धमक्या अनेकांनी(Y + security: Got real reason)  दिल्यामुळे त्यांना आव्हान देत ९ सप्टेंबर (k e y security) रोजी मुंबईला येणार असल्याचं कंगनाने स्पष्ट केलं. त्यापूर्वी तिला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली.