Main Featured

काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

rape case

राज्य परिवहन महामंडळात (एसटी) बसवाहकाचे काम देण्याच्या बहाण्याने वसईत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीवर बलात्कार (rape case)केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


पीडित तरुणी ही वसई पूर्वेला राहते आणि एका प्रसिद्ध कंपनीत काम करते. तिची ओळख सातिवली येथे राहणाऱ्या एका तरुणाशी झाली. या तरुणाने तिचा विश्वास संपादन करून तिला राज्य परिवहन महामंडळात (एसटी) महिला बसवाहक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. 
Must Read

त्यानंतर नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या काळात तिला वारंवार सातिवली येथील घरी येण्यास भाग पाडले आणि तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार (rape case)केले. मात्र तो नोकरी लावत नसल्याचे तिच्या लक्षात आले. 
याबाबत तिने जाब विचारला असता आरोपी तरुणाने तिची नकळत काढलेली अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.