scientists-found-viruses-eating-creatures

 सध्या जगभरात कोरोनाव्हायरस (Coronavirus) धुमाकूळ घालतो आहे. असे एक ना दोन कित्येक व्हायरस आहेत, ज्यांच्यामुळे जीवघेणे असे आजार बळावतात. सॅनिटायझर (Sanitizer, डिसइन्फेक्ट, यूव्ही लाइट्स यांचा वापर करून शरीर आणि एखाद्या पृष्ठभागावरील व्हायरसचा आपण नाश करू शकतो. तर शरीरातील व्हायरसचा नाश करण्यासाठी औषधं, लस यांचा वापर केला जातो. मात्र आता या जीवघेण्या व्हायरसचा खात्मा करणारे जीवही सापडले आहेत.

प्रथमच शास्त्रज्ञांना समुद्री सूक्ष्मजीवांचे दोन गट सापडले आहेत. ज्यांचा आहारच  विषाणू आहे. प्रोटिस नावाचे हे सूक्ष्मजीव जीवाणूंऐवजी विषाणू खातात. फ्रंटियर्स इन मायक्रोबायॉलॉजीमध्ये या सूक्ष्मजीवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर अमेरिकेजवळील अटलांटिक समुद्र आणि भूमध्य सागरातील स्पेनच्या कॅटालोनियाजवळील आखाती प्रदेशात हे जीव सापडतात.

Advertise


Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

समुद्री पर्यावरणातील विषाणूचं मॉडेल म्हणजे 'व्हायरल शंट'. जिथं व्हायरस-संक्रमित जंतू विरघळलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या तलावांमध्ये त्यांच्या रसायनांचा बराचसा भाग गमावतात. म्हणजेच असे काही सूक्ष्मजीव आहेत जे विषाणू (Virus) नष्ट करतात. हे जीव समुद्रात तरंगत असतात. हे जीव अगदी सूक्ष्म असतात. ते फक्त प्रयोगशाळेत खास उपकरणांखालीच दिसू शकतात. असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

या सूक्ष्मजीवांबाबत अजून बरंच संशोधन बाकी आहे. मात्र जर हे संशोधन यशस्वी झालं तर अनेक व्हायरसना हे जीव मात देऊ शकतात.  जर एखादा सूक्ष्मजंतू विषाणू खाऊ शकतो तर मग अनेक आजारांचा खात्मा करण्याचा हा मोठा मार्ग असेल. या सूक्ष्मजंतूंवरील प्रयोग यशस्वी झाले तर त्यांची पैदास करून औषध आणि लस निर्मितीत खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा वापर करता येऊ शकतो, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.