Main Featured

शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO

                                  शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawarयाच्या गाडीचं स्टिअरिंग त्यांच्या आणखी एका नातवाच्या हातात गेलं आहे. खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांचे चिरंजिव विजय सदानंद सुळे याया ड्रायव्हिंग परवाना मिळाला. नंतर विजय यानं थेट आजोबा शरद पवार यांना गाडीतून फेरफटका मारला. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात एक व्हिडीओ फेसबूक(facebook marketplaceवर शेअर केला. आहे. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून आपल्या नातवाला ड्रायव्हिंगचे धडे देत आहेत. त्यामुळे शरद पवार आपल्या नातवाला 'राजकीय स्टिअरिंग' हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना कन्या रेवती, पुत्र विजय ही दोन मुलं आहेत. त्यामुळे पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार हे रेवती आणि विजय यांनाही राजकीय आखाड्यात उतरवणार का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Must Read

1) राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

2) 19 वर्षीय कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेतच बलात्कार

3) बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्सचं सेवन

4) खुद्द अजित पवारांनी केला मोठा खुलासा

5) पुढचे तीन महिने कोरोनाचं आव्हान

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO

झालं असं की, विजय याला ड्रायव्हिंगचा नुकताच परवाना मिळाली. विजय यानं थेट आजोबा शरद पवार यांना गाडीतून फेरफटका मारला. यावेळी मागील सीटवर खुद्द सुप्रिया सुळे बसल्या होत्या. आजोबा शरद पवार आपल्या नातवाला ड्राईव्हिंगचे धडे देताना पाहून आई सुप्रिया सुळेंनी फेसबूक लाईव्ह केलं.

'आपली मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवायला शिकतात, तेव्हा वेगळा आनंद पालक म्हणून होतो, आज विजय सुळे, ज्यांना लायसन्स मिळाले आहे- लर्निंग आणि फायनल, तो त्याच्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे. सगळ्यांना छोट्या वाटत असल्या तरी आईसाठी मोठ्या गोष्टी असतात. 'इट्स अ स्पेशल मुमेंट फॉर अस' असं सुप्रिया सुळे यांनी दीड मिनिटांच्या फेसबुक लाईव्हमध्ये अखेरीस म्हटलं आहे.

ncp-sharad-pawar-gives-driving-lessons-to-supriya-sules-son-vijay-sule