Main Featured

Viral Memes: ‘अरे मैंने नहीं तोड़ा मैं Postman हूँ’…

Mumbai

India media- मुंबईबाबत (Mumbai) वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. हिमाचल प्रदेशातून बुधवारी ती मुंबईत दाखल होताच प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाने सारे विषय बाजूला सारत कंगनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर घरावरील कारवाईवरून कंगनाने दिवसभर ट्विटरवरून थयथयाट केला.


याच मुद्द्यावरुन सोशल मिडियावर (Social Media)दिवसभर चर्चा सुरु होती. दोन्ही बाजूचे समर्थक हॅशटॅग वॉरमध्ये अडकल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र याच दरम्यान एक मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कंगनाच्या कार्यालयाबाहेर वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी म्हणून चक्क पोस्टमनला पकडले आणि त्यालाच केलेल्या कारवाईबद्दल प्रश्न विचारु लागले असं दिसत आहे.

हे वाचा


कंगनाच्या घरातील कार्यालयावर बुधवारी सकाळीच मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली. मात्र याचे वृत्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा वृत्तांकन करताना गोंधळ उडाला आणि त्यांनी पोस्टमनलाच घेरले. आपण ज्या व्यक्तीला घेरलं आहे ती कोण आहे वगैरे याची चौकशी न करता पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. ‘क्या लेके आऐ हैं आप?’,’आपने ये क्यू तोडा?’,’उसने क्या किया?’,’कंगनाने क्या किया?’ असे अनेक प्रश्न हिंदी पत्रकारांनी या पोस्टमनलाच महापालिकेचा अधिकारी समजत विचारले. पोस्टमनही गोंधळून गेल्याचे चित्र व्हिडिओ दिसत आहे.

पोस्टमनही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘सरकारी नोटीस द्यायला आलो आहे. आम्ही हे तोडलेलं नाही,’ असं सांगतो. नंतर पत्रकारांकडून झालेला गोंधळ लक्षात आल्यानंतर पोस्टमनने, ‘मी पोस्टमन आहे पोस्टमन,’ असं पत्रकारांना सांगितलं. एवढं सांगितल्यानंतरही एका हिंदी महिला पत्रकाराला पोस्टमन काय बोलत आहे हेच समजले नाही आणि ती एकदम पोस्टमनवर ओरडत, ‘कंगनाने क्या किया. आप सब लोक मिलकर एक लेडीज को टार्गेट कर रहे हो,’ असं म्हणू लागली.

त्यानंतर इतर पत्रकारांनी या महिलेला हा पालिका अधिकारी नसून पोस्टमन असल्याचे सांगितले. एका पत्रकाराने ‘ते ते पाहा बीएमसीची अधिकारी,’ असं म्हटलं आणि पत्रकारांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला.
हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Social Media)झाला असून भारतीय प्रसारमाध्यमे कशाप्रकारे घाई करत गोंधळ निर्माण करतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.
१) हाच तो व्हिडिओ२) तू आहेस तुला ठाऊक नाहीय


3) हा चौथा स्तंभ असेल लोकशाही तर…
4) स्टार झालेत ते
5) प्रसारमाध्यमे अंधळी झाली

 6) असं काहीसं घडलं