Main Featured

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”

upsc exam



यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) (upsc exam)पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती. आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं असून, ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं. परीक्षेसाठीची (upsc exam) तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचे वकील अलख अलोक श्रीवास्तव यांना याचिकेची प्रत केंद्रीय लोकसेवा आयोग व केंद्र सरकार देण्यास सांगितलं होतं.