Main Featured

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत चिंता वाढली

Kolhapur corona cases

Kolhapur जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 900 नवे कोरोनाबाधित (corona)रुग्ण आढळले आहेत. बाधितांची एकूण संख्या 35 हजार 298 वर पोहोचली आहे. दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर 633 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त झाल्या आहेत. आजतागायत 22 हजार 744 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या 1 हजार 78 झाली आहे. मृतांसह बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.


दिवसभरात 1 हजार 289 जणांची प्राथिमक तपासणी झाली. 1 हजार 371 व्यक्‍तींचे आरटी-पीसीआर, सीबीनॅट, तर 526 संशयितांचे स्वॅब अँटिजेनवर तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दिवसभरात झालेल्या मृत्यूंत शहरातील 6, हातकणंगलेतील 5, पन्हाळा 4, आजरा, शाहूवाडीतील प्रत्येकी 2, करवीर, शिरोळ, राधानगरी, गडहिंग्लजमधील प्रत्येकी 1, सांगली जिल्ह्यातील 4, चिक्‍कोडी 3, निपाणी 1, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात दिवसभरात 302 नव्या रुग्णांची भर पडली आहे.






शनिवारी मध्यरात्री 12 वाजता 76 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरात 19, पन्हाळा 30, शिरोळ 22, करवीर 3, तर गगनबावडा, हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्‍तीचा समावेश आहे. रविवारी सकाळी 11.45 वाजता करवीर 1, हातकणंगले तालुक्यात 3 बाधित रुग्ण आढळले आहेत. दुपारी 12.15 वाजता 92 बाधितांची भर पडली. यात शहरात 45, हातकणंगले 19, पन्हाळा 5, करवीर 8, कागल व शिरोळमधील प्रत्येकी 4, भुदरगड 1 व जिल्ह्याबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. दुपारी 1.30 वाजता कागल 32, शहरात 11, हातकणंगले 3, भुदरगड 27, पन्हाळा 3, करवीर 10 व जिल्ह्याबाहेरील 1 असे एकूण 87 बाधित आढळून आले आहेत. दुपारी 1.45 वाजता शाहूवाडी 8, गडहिंग्लज 9, चंदगड 14, करवीर 5, हातकणंगले 8, शहरात 7 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्‍न झाले.
दुपारी 3.30 वाजता आलेल्या अहवालात शहरात 3, हातकणंगले व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. 4.15 वाजता 13 नव्या बाधितांची भर पडली. यात शिरोळ, कोल्हापूर शहर प्रत्येकी 4, करवीर, हातकणंगलेतील प्रत्येकी 3 जणांचा समावेश आहे. 4.30 वाजता हातकणंगलेत 2 बाधितांची भर पडली आहे. सायंकाळी 5.30 वाजता चंदगड 8, पन्हाळा 1, आजरा तालुक्यात 2 व्यक्‍तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्‍न झाले. सायंकाळी 6.45 वाजता 73 बाधित आढळले आहेत. यात गडहिंग्लज 13, आजरा 19, हातकणंगले 5, शिरोळ 34, करवीरमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. 
दरम्यान, याचवेळी तब्बल 277 बाधितांचे अहवाल प्राप्‍त झाले. यात Kolhapur शहरात 134, करवीर 42, हातकणंगले 19, कागल 14, पन्हाळा 19, भुदरगड व चंदगड प्रत्येकी 3, राधानगरी 8, शाहूवाडी व गगनबावडा प्रत्येकी 1, अन्य जिल्ह्यातील 33 जणांचा समावेश आहे. सायंकाळी 7 वाजता 89 जणांचा अहवाल प्राप्‍त झाला. यामध्ये गडहिंग्लज 2, करवीर 29, हातकणंगले 17, शहर 27, कागल 7, पन्हाळा 3, भुदरगड 1, आजरा 3, तर जिल्ह्याबाहेरील 2 व्यक्‍तींचा समावेश आहे. सायंकाळी 7.15 वाजता शाहूवाडी 6, हातकणंगले 16, राधानगरी 2, करवीर 8, कोल्हापूर शहरात 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवाल प्राप्‍त झाले आहेत.