Main Featured

सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर
gold silver rate today- सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरू आहे. या एका महिन्यात तब्बल १२०० रुपयांची घसरण दिसून आली. सोन्याचा आजचा भाव प्रतितोळे ५० हजार ३०० रुपये आहे. 

तज्ञांचे मत आहे की, सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे महिन्यांनंतर पुन्हा एकदा किंमत ५० हजार रुपयांच्या खाली आली आहे. स्पॉट मागणी कमकुवत झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचे ठेव व्यवहार कमी केले आहेत. गुरुवारी दिल्ली सर्राफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 485 रुपयांनी घसरून ५०,४१८ रुपयांवर आला. 

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..


आता पुढच्या एका महिन्यात सोन्याच्या दरावर आणखी दबाव येणार असून तो घसरुन ४७,००० पर्यंत जाऊ शकतो. पण दर जास्त काळ कमी राहणार नाहीत. ३ महिन्यांतील सोन्याच्या दरांमधली वाढ पाहता सोनं पुन्हा एकदा महाग होऊ शकतं.

शुक्रवारी सोनं १२५ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीचा (gold silver rate today)भाव १२५० रुपये प्रति किलोग्रॅम पाहायला मिळाला. सध्याच्या व्यापारात सोनं सर्वाधिक ५०,७५० च्या खाली ५०,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी वर ५८,००० आणि खाली ५७,८००० रुपये प्रति किलो ग्रॅम विकली गेली. सोना ५० ६५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ५७, ९०० रुपये प्रति किलोग्रॅम आणि चांदीची नाणी ७२५ रुपये प्रति नग राहीली. 

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ४८५ रुपये नुकसानी सोबत ५०, ४१८ रुपये प्रति १० ग्राम राहीली. HDFC सिक्युरीटीजच्या म्हणण्यानुसार, आदल्या दिवशी व्यवसाय ५०, ९०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. चांदी देखील २,०८१ रुपयांवर कमी होऊन ५८,०९९ रुपये प्रति किलोग्रॅमवर राहीली. मागच्या व्यावसायिक सत्रात ६०,१८० रुपये प्रति किलोग्रॅम होती. 

बुधवारी सोन्याचा भाव १.३६ टक्क्यांनी घसरुन ४९ हजार ६९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे.  तर चांदीचा दर बुधवारी २८१२ रुपयांनी घसरुन ५८ हजार ४०१ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. 

मंगळवारी एक किलो चांदीचा दर ५७८१ रुपयांनी घसरुन ६१,६०६ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. तर सोमवारी चांदीचा भाव ६७,३८७ रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. सोमवारी सोन्याच्या दरात ६७२ रुयांची घसरण होऊन सोन्याचा भाव ५१,३२८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. कोरोना काळात शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडे मोठा कल आहे.