Main Featured

CCTV मध्ये कैद झाली भयंकर घटना


time-in-mumbai-The-incident-was-captured-on-CCTV

time in mumbai मुंबईत Mumbai कांदिवली परिसरात मेट्रो प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. शनिवारी दुपारी जवळपास पावणे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावर बसवण्यात आलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

कांदिवली हायवेवर एका दुचाकीवरून दोघे जात होते. तितक्यात रस्त्याच्या बाजूला ठेवलेले मेट्रोचे बॅसाट्याच्या वाऱ्यामुळे चालत्या दुचाकीवर पडले. त्यामुळे दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती मागून येणाऱ्या ट्रकच्या चाका खाली चिरडला गेला. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू Death झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अवघ्या 14 सेकंदात घडली.

अनेकदा नागरिकांनी तक्रार देऊन देखील मेट्रो प्रशासनाकडून रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या बॅरिकेटिंग बाजूला केल्या जात नाही आहेत. अत्यंत बेजबाबदारपणे हायवेवर बॅरेकेटिंग ठेवण्यात आल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. अधून मधून सोसाट्याचा वाराही सुटतो. त्यामुळे या बॅरिकेटिंग हायवे वरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडण्याच्या घटना कायम घडत असतात. तरी देखी मेट्रो प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही आहे.

अवघ्या 14 सेंकदात झालं होत्याचं नव्हतं..

ही घटना अवघ्या 14 सेकंदात घडली. एका निरपराध व्यक्तीला मेट्रो प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हि़डिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे.

दरम्यान, संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेटिंग ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.