Main Featured

टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन


tata-New-Parliament-House-to-be-constructed

tata संसद भवनाची नवी इमारत The building सेट्रल विस्टा उभारण्याचं कंत्राट टाटा समुहाला मिळालं आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसंदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं कंत्राट मिळवलं आहे.

टाटा समुहासोबतच या प्रक्रियेमध्ये लार्सन अँड टुब्रो, शापुरजी पालनजीसारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश होता. या कंपन्यांना पछाडत टाटा समुहानं tata हे कंत्राट मिळवलं आहे. यापूर्वी संसदेच्या इमारतीचं कंत्राट मिळवण्यासाठी सात कंपन्या या शर्यतीत होत्या. त्यानंतर केंद्रीय लोकनिर्माण विभागाकडून तीन कंपन्यांची ऑनलाइन प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. संसदेची नवी इमारत पार्लियामेंट हाऊसच्या प्लॉट नंबर ११८ वर उभी राहणार आहे. या इमारतीची उभारणी सेंट्रल विस्ता रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत होणार आहे.

संसदेच्या नव्या प्रस्तावित भवनाचा एकूण परिसर ६५ हजार चौरस मीटर इतका आहे. यामध्ये एकूण १६ हजार ९२१ चौरस मीटरच्या बेसमेंटचाही समावेश आहे. नवं संसद भवन दोन मजली असेल. तसंच २०२२ मध्ये भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याचं काम पूर्ण होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर नव्या संसद भवनाच्या उभारणीचं काम सुरू होणार आहे.

संसदेची सध्याची इमारत ही ब्रिटीशकालिन असून ती गोलाकार आहे. नवी इमारत ही त्रिकोणी असणार आहे. यापूर्वी सरकारनं संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी ९४० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. परंतु टाटा समुहानं ८६१.९० कोटी रूपये तर लार्सन अँड टुब्रो या कंपनीनं ८६५ कोटी रूपयांची निविदा दिली होती.