Main Featured

मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील व्यक्तीस शासन सेवेत घ्या


इचलकरंजी येथे  कोव्हिडचा प्रभाव रोखण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी अहोरात्र एकदिलाने काम करीत आहेत. त्यामुळे कर्तव्य बजावताना कॉव्हिडमुळे मुत्यू पावलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील व्यक्तीस अनुकंपातत्वावर शासन सेवेत घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने कोरोनाच्या साथीमध्ये जे कर्मचारी कोव्हिडच्या साथीने मृत्यूमुखी होतील त्यांना विमा कवच देण्याचा घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. त्यामुळेच कोरोनाच्या साथीच्या काळात आरोग्य सेवा संबंधीत कर्मचार्‍यांच्या व्यतीरिक्त जिल्हा प्रशासन, पोलीस, नगरपरिषद, महानगरपालिका, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, महसुल विभाग, अन्न व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी कोरोना साथीचा प्रार्दभाव रोखन्यासाठी कर्तव्य पार पाडत आहेत. 

Must Read

या साधीच्या लढ्यात जे कर्मचारी कर्तव्य बजावताना दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबाचे जनजीवन आंधकारमय होऊन सदर कुटूंबावर उपासमारीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या कुंटूबियांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी व त्यांना पाठबण देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपातत्वावर नोकरीत समाविष्ट करुन घेणे उचित होणार आहे. यासाठी शासन स्तरावरून धोरणात्मक निर्णय होऊन सदर कर्मचार्‍यांना न्याय देण्याची मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी निवेदनात केली आहे.