Main Featured

बिबट्याच्या जबड्यातून मुलाला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान, अंगावर शहारे आणणारा VIDEO


बिबट्याच्या जबड्यातून मुलाला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान, अंगावर शहारे आणणारा VIDEO

आई 
Mom आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी अॅडजेस्ट करते. वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मुलाला अडचणीच्या प्रसंगातून वाचवते आणि त्याला पुन्हा लढण्यासाठी सक्षम करते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते, आपण हे बर्‍याच वेळा ऐकले असेल आणि पाहिले असेलच. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आईनं आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं.

या व्हिडीओमध्ये रान डुकराच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्या Leopards तयारीत असतो. एक क्षण तो या पिल्लाला जबड्यात पकडतोही मात्र त्याची आई हा प्रकार पाहून संतापते आणि बिबट्याच्या जबड्यातून आपल्या पिल्लाची सुटका करवू बिबट्याला पळवून लावते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


तो. दोन प्राण्यांच्या या धोकादायक लढाईचा आणि मुलाला वाचवण्यासाठी आईने केलेल्या संघर्षाचा व्हिडिओ संदीप मॉल नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आईची ममता, आई आपल्या पिल्लासाठी काहीही करू शकते असे अनेक कॅप्शन्स या व्हिडीओमध्ये देण्याच आले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.