Interior Designबॉलिवूड (bollywood)अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.मात्र यावेळी सुझान आपल्या आलिशान घरामुळे (Interior Design)चर्चेत आहे. 
सुझानने आपल्या आलिशान घराचे फोटो आणि व्हिडाओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सुझान मुंबईतील जुहू येथील एका इमारतीत १५ व्या मजल्यावर राहाते.सुझानने १ हजार चौरसफुटाचे दोन फ्लॅट एकत्र करुन आपला आलिशान फ्लॅट तयार केला आहे.ती एक उत्तम इंटिरिअर डिझायनर (Interior Design)आहे.

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

आपल्या संपूर्ण घराचं इंटिरिअरिंग तिनेच केलं आहे. यापूर्वी तिने शाहिद कपूर, रणबिर कपूर, आलिया भट्ट, अर्जून रामपाल यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांच्या घरांचे इंटिरिअर डिझायनिंग केलं आहे.हृतिक रोशन आणि सुझान खान बॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल म्हणून ओळखले जाते. 
हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी २०१४ साली घटस्फोट घेतला होता. लक्षवेधी बाब म्हणजे घटस्फोटानंतरही दोघांमध्ये खुप चांगली मैत्री आहे. सण आणि कौटुंबीक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. सुझान जुहू येथील या घरात आपल्या मुंलांसोबत राहाते. सुझान खानने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.