Main Featured

सुशांतच्या अंत्यसंस्काराचा VIDEO पाहून भडकली अंकिता, म्हणाली...

Ankita Lokhande angry on viral sushant singh rajput videoEntertainment News- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput)मृत्यूला 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. याप्रकरणी एकीकडे सीबीआय त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहे,  तर दुसरीकडे त्याचे चाहते आणि कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. या सर्व प्रकरणादरम्यान

ट्विटरवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) अंत्यसंस्कारांच्या दरम्यानचा एक व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) राग अनावर झाला आणि तिने त्या युजरला चांगलेच सुनावले आहे. तिने हा व्हिडीओ त्वरित डिलिट करण्यास सांगितले आहे.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

एका ट्विटर युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ सुशांतच्या अंत्यसंस्कारा दरम्यानचा आहे. या युजरने हा व्हिडीओ शेअर करताना असे लिहले आहे की, 'मला हा व्हिडीओ शेअर करायचा नव्हता पण या कारणामुळे शेअर केला आहे की, जेव्हा कधी बॉलिवूड सिनेमा पाहायचे मनात येईल तेव्हा हा चेहरा लक्षात ठेवा.' या व्हिडीओमध्ये त्याने सुशांतची बहिण, त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्यासह अनेकांना टॅग केले आहे.

अंकिताने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिने असे लिहले आहे की, 'तुम्हाला काय झाले आहे? असे व्हिडीओ शेअर करणं बंद करा. तुम्हाला विनंती करते की त्वरित हा व्हिडीओ डिलीट करा. मला माहिती आहे की तुमचे त्याच्यावर प्रेम आहे, पण पाठिंबा देण्याची ही पद्धत नव्हे. मी हात जो़डून विनंती करते हा व्हिडीओ डिलीट करा.'

दरम्यान अंकिताने हा व्हिडीओ रिट्वीट करत त्यावर खडे बोल सुनावले असल्याने तिच्यावर काही युजरनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करण्याची काय गरज होती असा सवाल तिला विचारण्यात येतो आहे.

सुशांतचा मृतदेह 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात सापडला होता. त्याच्या अंतिम संस्कारांमवेळी अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित नव्हती. ती सुशांतला अशा परिस्थिती पाहू शकत नसल्याने ती उपस्थित नसल्याचे तिने सांगितले होते.