Main Featured

सूर्य असेर्पयतच जेवायला महत्त्व आहे .. ते का?


sun rise sun set

sun rise sun set
 
दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.

सूर्य Sun म्हणजे साक्षात अग्नी. पचनाला मदत करणारा.आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे. 

सर्वात शुद्ध काय असते ? 
अग्नी सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नी. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतू Organism नष्ट व्हायला सुरूवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.आपण   सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनी, शुक्र  हे सर्व   भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत आपली कामं करीत असतात.
 

आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो.  पशुपक्षीदेखील, सकाळी  उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.आजच्या वैज्ञानिक नियमानुसार ‘फोटो सिंथेसिस’  ही प्रक्रि या देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे  मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटॅमिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटॅमिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी.  

तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे. या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामं करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्य दिवसाचीच केली जातात. 

कधी विचार केलाय, असं का?
तेव्हा  उत्तर मिळेल, sun rise sun set सूर्य असतो म्हणून. तसेच जेवणो हे जर यज्ञकर्म असेल तर ( ते आहेच!)  ते सुद्धा सूर्य असेपर्यंत पार पडले पाहिजे ना !  म्हणूनच सूर्य असेपर्यंत जेवां. कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना ! तेच नियम आपणही पाळले पाहिजेत जे ‘त्याने’ ठरवून दिलेले आहेत.
निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !