Main Featured

टेरेसवरून उडी मारून 32 वर्षीय तरूणाची आत्महत्या


  

suicide of youth

तरुणाने स्वत:च्या गळ्यावर शस्त्राने वार करून अंगावर जखमा करून घेत इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात हा प्रकार घडला असून, जीव जात नसल्याने त्याने शेवटी(32-year-old commits suicide) इमारतीवरून उडी मारल्याचे सांगण्यात येते. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

राहुल रामा सूर्यवंशी (वय ३२, मूळ रा. दगडवाडी, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या रा. कस्तुरभा सोसायटी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Must Read

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा हमालीचे कामे करत होता. तो पत्नीसोबत विश्रांतवाडीत येथील कस्तुरभा सोसायटीत राहत होता. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे त्याची पत्नी गावी गेली होती. त्यामुळे राहुल एकटाच होता. सोमवारी त्याने राहत्या घरात स्वतःचा गळा चिरून घेतला. त्यानंतर शरीरावर सर्वत्र जखमा करून घेत जखमी झाला. 

तरीही(32-year-old commits suicide) जीव जात नसल्याने त्याने इमारतीवरून खाली उडी मारली होती. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Suicide Squad 2)मात्र अति रक्तस्त्रावामुळे त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. राहुलने आत्महत्या का केली याचा पोलिस शोध घेत आहेत.