Main Featured

ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन



student login कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे शालेय विद्यार्थ्यांना आॅनलाइन Online शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा स्थितीत जे विद्यार्थी स्मार्टफोन खरेदी करण्यास असमर्थ आहेत व त्यामुळे ते आॅनलाइन वर्गांना हजेरी लावू शकत नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारांनी स्मार्टफोन smartphone व योग्य संसाधने उपलब्ध करून द्यावीत, असे सांगण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे.

राजस्थानच्या बांसवाडाचे खा. कनकमल कटारा यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पोखरियाल म्हणाले की, गरीब विद्यार्थ्यांना Students डिजिटल सेवा प्रदान करण्यासाठी राज्य सरकारांनी सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत संसाधने पोहोचवावीत, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना संसाधनयुक्त बनविण्यासाठी नवीन शिक्षण धोरणातही राज्य सरकारांची भागीदारी महत्त्वाची आहे.

३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या
टॅबवर केले अपलोड

एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, ई-पाठशाळा अ‍ॅपवर एनसीईआरटीची संपूर्ण पाठ्यसामग्री उपलब्ध आहे. सरकारच्या सांगण्यावरून मागील वर्षी एनसीईआरटीने ३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या टॅबवर आॅफलाइन मोडवर अपलोड केलेले आहेत.