politics newspolitics news- 'आपण महिनाभरात भाजप सोडणार असून, दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतीक्षा आहे', असा संवाद भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यासोबत केल्याच्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर (social media)व्हायरल झाली आहे. त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, खडसे यांनी पक्षांतराचा इन्कार केला आहे.

एकनाथ खडसे यांनी पक्षातील काही मंडळींमुळे आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत त्यांना स्थान दिले गेले नाही. आता तर राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे.


Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या, अशी विनवणी करत आहे. अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे नामक एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

व्हायरल झालेल्या क्लिपमधील संवादानुसार सदर कार्यकर्त्याने खडसे यांच्याशी संवाद साधताना ‘भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारिणीतही (politics news)डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या, अशी मागणी केली. त्यावर खडसे म्हणाले, हो निर्णय घ्यायचा आहे. 

दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ, असे खडसे यांनी या कार्यकर्त्याला सांगितल्याचा संवाद या क्लिपमध्ये आहे. 

ही क्लिप सोशल मीडियावर (social media) व्हायरल होताच महिनाभरात खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, या क्लिपमधील संवादाविषयी खडसे यांनी सांगितले की, कार्यकर्ते अशा प्रकारची विचारणा करीतच असतात. तो कॉल चुकीचा असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.