Main Featured

शेअर बाजाराने मारली डुबकीे


The stock market plunged | शेअर बाजाराने मारली डुबकीे

जगभरातील 
शेअर बाजारांमध्ये stock markets वाढलेल्या विक्रीच्या जोराचा प्रभाव भारतातही दिसून आला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६३४ अंशांनी गडगडला. निफ्टीनेही ११,३५० अंशांच्या खाली डुबकी घेतली.

शुक्रवारी बाजार सुरू झाला तो मुळी खाली येऊनच. त्यातच बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६३३.७६ अंश म्हणजेच १.६३ टक्क्यांनी खाली आला. बाजार बंद होताना तो ३८,३५७.१८ अशांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.६८ टक्के म्हणजेच १९३.६० अंशांनी कमी होऊन ११,३३३.८५ अंशांवर बंद झाला. जोरदार विक्रीमुळे या निर्देशांकाला ११,३५० अंशांची पातळी राखता आली नाही.

जगभरात झाली घसरण

जगभरातील शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्यामुळे घसरण झालेली दिसून आली. वॉलस्ट्रीट येथे मुख्यत: तंत्रज्ञानविषयक समभागांमध्ये मोठी घसरण झालेली दिसून आली. युरोपातील शेअर बाजार मात्र काहीसे सकारात्मक वातावरणात सुरू झाले. आशियातील शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सेऊल येथील शेअर बाजारांमध्येही विक्रीचा दबाव येऊन घसरण झालेली दिसून आली.