Main Featured

सुशांतच्या घरी तिसऱ्यांदा पोहोचली CBI ची टीम, अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा


सुशांतच्या घरी तिसऱ्यांदा पोहोचली CBI ची टीम, अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयची टीम दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सीबीआयची दोन पथकं वांद्रे येथील कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅक या इमारतीतील सुशांतच्या घरात पोहोचली आहेत.

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुशांत राहात होता त्या इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचे पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाईल, असंही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सुशांतच्या घरी सीबीआयच्या टीम तिसऱ्यांदा दाखल झाल्या आहेत. या आधी दोन वेळा सीबीआयच्या टीम सुशांतच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी सुशांतच्या इमारतीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शनची तपासणी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या बेडरुममध्ये त्याच्या आत्महत्येचं नाट्य रुपांतरही करण्यात आलं होतं.

अखेर शौविक चक्रवर्तीला अटक...

दुसरीकडे, सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला अखेर एनसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. अंमली पदार्थ बाळगणे, खरेदी करणे आणि अंमली पदार्थ घेवून प्रवास करणे या प्रकरणी शौविकला अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा कलम 20 ( ब ), कलम 28, कलम 29 आणि कलम 27 ( अ ) या कलमांतर्गत शौविकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुशांतसिंह राजपूतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा याला देखील अटक करण्यात आली आहे.

बसित, जैद, शौविक आणि सॅम्युल मिरांडा यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे शौविक याच्या सांगण्यावरून बसितनं जैदकडून अंमली पदार्थ आणले होते. जैदकडून शोविकनं अंमली पदार्थ खरेदी केले. शौविक अंमली पदार्थ घेवून सॅम्युलकडे गेला आणि शौविकच्या सांगण्यावरून अंमली पदार्थांचे पैसे दिले आणि शौविकच्या सांगण्यावरून तसेच त्याच्याकडून घेतलेले अंमली पदार्थ मी म्हणजे सॅम्युलने सुशांतसिंह राजपूतला दिल्याची कबुली या सर्वांनी दिली आहे. त्यामुळे एनसीबीने शौविक आणि सॅम्युल मिरांडा यांना अटक केली आहे.

रियाच्या अटकेची शक्यता..

रियाचा भाऊ शौविक आणि रियाचा खास माणूस सॅम्युल मिरांडा यांच्या अटकेमुळे आता रियाच्या अटकेची ही दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण शौविक आणि रिया यांच्या देखील अंमली पदार्थ खरेदी विक्री बाबतीत चॅटिंग झाले होते. रियाचे संशयीत अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या याच्या सोबतच्या चॅटवरुनच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात रियाला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे.