Main Featured

कंगनाला 9 तारखेला मुंबईत येऊ तर द्या, शिवसेनेचा सज्जड इशारा

kangana ranaut


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी (kangana ranaut) व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी दिला आहे.


शिवरायांच्या महाराष्ट्रावर (Maharashtra) एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा एक पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे. कंगनाला मराठी समजत का? तिनं स्वतःचा ट्विटर हँडल स्वतः हँडल करावा. कोणत्या राजकीय पक्षाच्या आयटी टीमला द्यायची काय गरज आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.Must Read
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, कंगनानं मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही आहे. मात्र, त्यांनी हे जरा अधिक जोरात बोललायला हवं होतं. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
हे आंदोलन फक्त शिवसेनाच आहे का? तर नाही कालच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पोस्टरवर मत मागायला शिवाजी महाराज नसतात. तसेच काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील स्पष्ट केलं आहे की, कंगनाला (kangana ranautमहाराष्ट्रात राहाण्याचा अधिकार नाही.  मात्र, अमृता फडणवीस आणि रामदास आठवले यांनी केल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टाळलं.
शिवसेनेनं पुकारले सोशल आंदोलन
दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कॅम्पेन सुरू केलं आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पोस्टर तयार केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण तीव्र झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत (Anil Deshmukh) सर्व स्तरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे.