Main Featured

दोन्ही राजेंना, शरद पवारांनी लगावला सणसणीत टोला

politics-sharad pawar criticize both rajepolitics- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांनी मराठा रक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला आहे.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

शरद पवार (sharad pawar)आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सांगितलं की, संजय राऊत यांनी फडणवीस यांची घेतलेल्या मुलखातीचा राजकीय (politics)अर्थ काढायचे कारण नाही.

राऊत यांनी माझी ही मुलाखत घेतली होती. चंद्रकांत पाटील यांनी ही मुलाखत राजकीय असल्याचे वक्तव्य केले होतं. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.