Main Featured

शरद पवारांनी घेतली शाळा!

Sharad Pawarकोरोनाचा संसर्ग (coronavirus)दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे. पुणे (Pune)शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा याबाबतही शरद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेत त्यांची चांगलीच कान उघाडणी केली.
बारामती हॉस्टेलवर झालेल्या या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या का वाढतेय? असा शरद पवार यांनी जाब विचारला. पत्रकार मृत्यू प्रकरण, त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरबाबत का त्रुटी आहेत, याबाबतही विचारणा केली आणि सूचना केल्या.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची तातडीनं बैठक बोलावली. कोरोनाबाबत पुण्यात स्थिती का बिघडतेय हे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती.
काय म्हणाले सौरभ राव?
देशात सर्वाधिक रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आहेत. तरी घाबरून जायचं कारण नाही. कारण बरे होण्याचं प्रमाण पण अधिक आहे. चाचण्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त सौरव राव यांनी यावेळी सांगितलं.