Main Featured

सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा

sangli News- janata curfew

sangli News- कोरोनाचा (corona)संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने शुक्रवारपासून दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. परंतु व्यापाऱ्यांनी आर्थिक कोंडीचे कारण देत त्याला विरोध केला होता. त्यानुसार आज (दि.११) पहिल्याच दिवशी सर्व व्यवहार सुरळीत राहिले. बाजारपेठेत गर्दी कायम होती. 


त्यामुळे जनता कर्फ्यूचा बोजवारा उडाला आहे. सांगली मिरजेसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सर्व बाजारपेठा व दैनंदिन व्यवहार सुरु होते.

कोरोनाची (corona) साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युला मिरजेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. मिरजेत काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवून बंदला विरोध केला. तर बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठींबा दिला. नागरीकांनी मात्र कामानिमित्तच घराबाहेर पडणे पसंद केले.

Must Read


कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......


राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच, पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या