Main Featured

सांगलीत परिस्थिती चिंताजनकच

sangli death rateSangli- सांगली जिल्हा, महापालिका क्षेत्राचा मृत्यूदर (death rate) घसरला, मात्र मृत्युंची संख्या चिंताजनकच राहिली. मात्र आकडेवारी पाहिता जग, भारत (India) आणि महाराष्ट्र यांचा मृत्यू दर घसरला असला तरी सांगली जिल्हा आणि सांगली महापालिका क्षेत्राचा मृत्यूदर मात्र वाढला आहे. 

मृत्यू संख्येत वाळवा, मिरज पुढे

सांगली महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना मृत्युंची (corona)संख्या वाळवा तालुक्यात सर्वाधिक 107 आहे. त्याखालोखाल मिरज तालुक्यात 106 आहे. तासगाव तालुक्यातील 84, पलुस तालुका 44, कवठेमहांकाळ तालुका 32, खानापूर तालुका 29, जत तालुका 27, शिराळा तालुका 25, कडेगाव 21 आणि आटपाडी तालुक्यातील 13 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 
मृत्यूदर आणि मृत्युंची संख्या नियंत्रणात (death rate)आणण्याचे आव्हान प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेपुढे आहे. अधिकाधिक तपासणी, वेळेत निदान आणि पॉझिटिव्ह व्यक्तींना (corona positive)तातडीने उपचाराखाली आणणे महत्वाचे आहे.  लोकांनीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हाताची स्वच्छता याबाबी काटेकोरपणे पाळून कोरोनाचा प्रसार रोखण्यात पुढाकार घेतला पाहिजे. 

Must Read