Main Featured

सांगली जिल्ह्यात कोरोना संखेत वाढ

Sangli corona cases

Sangli- जिल्ह्यात शुक्रवारी 936 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह (coronavirus) आल्या. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 210 व्यक्‍तींचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील 36 आणि परजिल्ह्यातील 2 व्यक्‍ती, अशा एकूण 38 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील 961 व्यक्‍ती अतिदक्षता विभागात (corona cases)आहेत. शुक्रवारी उच्चांकी 875 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त झाल्या. दरम्यान कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


जिल्ह्यात शुक्रवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 21 हजार 370 झाली आहे. शुक्रवारअखेर एकूण 11 हजार 622 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त  झाल्या आहेत. सध्या 8 हजार 950 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 961 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


Must Read


त्यातील 810 व्यक्ती ऑक्सिजनवर(oxygen), 101 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेन्टीलेटरवर, 42 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर, आणि 8 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेन्टीलेटरवर आहेत. उपचाराखालील 6 हजार 371 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. गुरूवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 798 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

सांगली महापालिका क्षेत्रात गुरूवारी 210 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 137 आणि मिरजेतील  73 व्यक्तींचा समावेश आहे. आटपाडी येथील 24, निंबवडे 21, दिघंची 2, लिंगिवरे 1, पिंपरी खुर्द 6, भिंगेवाडी 3, खरसुंडी 4, पुजारवाडी 4 आणि विठलापूर येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. 


corona cases


शिराळा 8, मांगले 3, चिखलवाडी 6, चिखली 3, बिळाशी 4, मांगरूळ 1, पणुंब्रे वारूण 1, चरण 1, चिंचोली 5, रिळे 1, सोनवडे 2, कांदे 1 आणि उपवळे येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. तासगाव 16, वायफळे 2, आरवडे 4, डोंगरसोनी 2, सावळज 3,  मांजर्डे 4, विसापूर 1, हातनोली 2, नेहरूनगर 4, शिरगाव 2, चिंचणी 1 आणि तुरची येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. कवठेमहांकाळ 13, नागज 8, लंगरपेठ 6, घाटनांद्रे 5, मळणगाव 5, रांजणी 5, कोंगनोळी 4, खरशिंग 3, बनेवाडी 3, ढालेगाव 3, हिंगणगाव, धुळगाव, देशिंग, हरोली, दुधेभावी, आणि आरेवाडी येथील प्रत्येकी 2, इरळी, अलकुड एस, आगळगाव, करलहट्टी, शिरढोण, जाधववाडी, कदमवाडी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. 

जत शहरात 7, बसर्गी 10, नवाळवाडी 6, अचकनहळ्ळी 6, भिवर्गी 5, वाळेखिंडी 3, बनाळी, रेवनाळ, निगडी खुर्द आणि कोसारी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. इस्लामपूर येथील 31, साखराळे 1, बोरगाव 11, भडकंबे 1, तांबवे 1, बागणी 6, शिगाव 1, काकाचीवाडी 1, रोझावाडी 4, पेठ 5, ओझर्डे 1, वाघवाडी 1, कामेरी 7, बहे 2, ऐतवडे खुर्द 1, चिकुर्डे 3, नेर्ले 16,  अहिरवाडी 1, गोटखिंडी 2, वाळवा 1, कासेगाव 1, रेठरेधरण 2, काळमवाडी 1, येडेनिपाणी 3, कुरळप 1, येलूर 1 आणि आष्टा येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली.

खानापूर तालुक्यात विटा येथील 49, चिंचणी (मं) 3, आळसंद 1, बेणापूर 3, रेवणगाव , सुलतानगादे, खंबाळे, भाळवणी, भाग्यनगर, जोंधळखिंडी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. पलूस 10, वसगडे 15, आमणापूर 7, बुर्ली 6, अंकलखोप 10, तुपारी 2, भिलवडी 3, दुधोंडी 1, कुंडल 8, रामानंदनगर 16, सावंतपूर  5, पुणदी 2 आणि घोगाव येथील 5 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. 

कडेगाव तालुक्यात आसद, बोरगाव, चिखली, चिंचणी, कान्हरवाडी, खेराडेवांगी, मोहिते वडगाव, नेवरी, शाळगाव, सोनकिरे येथील प्रत्येकी 1, कडेगाव 13, खेराडे विटा 5, रामापूर 11, शिवणी 5, उपाळेमायणी 6, विहापूर 2, वांगी येथील 5 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. कवलापूर 6, बुधगाव 3, मालगाव 5, एरंडोली 3, टाकळी 1, सलगरे 5, सुभाषनगर 4, शिपूर 2, आरग 2, भोसे 1, सोनी 1, सावळी 1, कुमठे 2, कांचनपूर 1, बामणोली 1, बिसूर 2 आणि कर्नाळ येथील 6 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.