Main Featured

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९३६ बाधित

corona positive

Sangli- जिल्ह्यात शनिवारी 936 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह (corona positive)आल्या. यामध्ये सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 346 व्यक्तीचा समावेश आहे. शनिवारी जिल्ह्यातील 23 आणि परजिल्ह्यातील 2 अशा एकूण 25 व्यक्तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील 961 व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत. शनिवारी 754 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. 


जिल्ह्यात शनिवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींंची संख्या 22 हजार 306 झाली आहे. शनिवारअखेर एकूण 12 हजार 376 व्यक्ती कोरोनामुक्त  झाल्या आहेत. सध्या 9 हजार 109 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 961 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

Must Readत्यातील 794 व्यक्ती ऑक्सिजनवर, 108 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेन्टीलेटरवर(ventilator),49 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर (oxygen) आणि 7 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेन्टीलेटरवर आहेत. उपचाराखालील 6 हजार 548 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. शनिवार अखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 821 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
सांगली महापालिका क्षेत्रात शनिवारी 346 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 247 आणि मिरजेतील  99 व्यक्तींचा समावेश आहे. शनिवारअखेर सांगली महापालिका क्षेत्रातील एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 10 हजार 131 झाली आहे. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह
आटपाडी-886, जत-693, कडेगाव-1004, कवठेमहांकाळ-991, खानापूर-997, मिरज-2197, पलूस-1059, शिराळा-906, तासगाव-1279, वाळवा-2163.        महापालिका क्षेत्र-10131