Main Featured

सलमान खानच्या अडचणी वाढल्या

Salman Khan


राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या काळवीट शिकार (black buck case)प्रकरणात बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan)याच्या अडचणीत वाढल्या आहेत. जोधपूर कोर्टानं सलमानला कोर्टात (Court) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


राजस्थानमधील जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयानं सलमानला २८ सप्टेंबर रोजी कोर्टात राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमवरी जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सलमानचे वकील स्तीमल सारस्वत कोर्टात उपस्थित होते. यापूर्वी सलमाननं सुनावणीला कोर्टात (court)हजर राहण्यास सूट मागितली होती. कोर्टानं त्याची विनंती मान्य केली होती आता मात्र त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु सलमाव पुन्हा एकदा सुनावणीसाठी हजर न राहण्यासाठी सूट मिळावी यासाठी अर्ज करून शकतो, अशी माहिती आहे.

काळवीट शिकार प्रकरणात  (black buck caseखोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टानं निर्दोष ठरवलं आहे. राजस्थान सरकारनं २००६ मध्ये सलमानवर खोटं प्रतिज्ञापत्र जमा केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.


Must Read