Main Featured

अंगावरून 2 वेळा गेली कार, तरीही वाचला जीव, पाहा VIDEO


ret a car काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असाच एक भयंकर प्रकार चिमुकल्याच्या बाबतीत घडला. रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याला समोर मरण दिसलं तो घाबरला आणि पळू लागला मात्र समोरून येणाऱ्या कार चालकानं कार थांबण्याऐवजी त्याला चिरडून पुढे गेल्याची धक्कादायक घटना मुंबई Mumbai उपनगरात घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

पश्चिम The west उपनगर मालाडच्या पश्चिमेला मालवणी परिसरात म्हाडा कॉलनी इथे हा थरारक प्रकार घडला. रस्त्यावर खेळत असणाऱ्या चिमुकल्याच्या अंगावर भरधाव दुचाकी गेली. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


3 वर्षांच्या चिमुकला रस्त्यावर खेळत असताना अचानक मागून कार आली. अंगावर कार येत असल्याचं पाहून चिमुकला घाबरला आणि गोंधळून गेला. भरधाव कारचे टायर त्याच्या अंगावरून गेले. या घटनेमध्ये चिमुकला जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले.

कार अंगावरून गेल्यामुळे यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीनं कार चालकाचा शोध सुरू आहे. कार चालकानं मुलाला चिरडल्यानंतर साधे औदार्य दाखवले नाही. तर पकडले जावू या भीतीनं त्यानं पळ काढला असून मालवणी पोलीस सध्या या कार चालकाचा तपास करत आहेत.