Main Featured

19 वर्षीय कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेतच बलात्कार


What happens when you look at crime by the numbers | Science News for  Students

माणूसकीला काळीमा फासणारा बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णावाहिकेच्या चालकाने कोविड-19 Kovid-19 संक्रमित 19 वर्षीय 19-year-old 
तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना केरळच्या पटनमिठ्ठाच्या अरममुला परिसरात घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीसह रुग्णवाहिकेमध्ये आणखी एक रुग्ण होता. त्याला आधी उतरवलं आणि त्यानंतर तो एका अज्ञात स्थळी गेला. तरुणीला रुग्णवाहिकेत एकटं पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं.

खरंतर, देशात कोरोना संक्रमणाचा प्रकोप होत आहे. अशात ही घटना म्हणजे संपूर्ण व्यवस्थेसमोर प्रश्न आहे. तरुणीला कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर आरोपी चालकाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आधीच देशात कोरोनाचा धोका वाढतोय त्यातून अशा घटना घडत असल्यामुळे आणखी संभ्रम वाढत आहे. आजही देशात कोरोनाच्या रुग्णांनी सर्व रेकॉर्ड मोडले. रोज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नवीन संख्या समोर येत आहे. कोरोना रूग्णांची संख्या शनिवारी विक्रमी 90 हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर आता गेल्या 24 तासांत 90 हजार 632 असा कोरोना (Corona) रुग्णांचा नवा आकडा समोर आला आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या या नव्या संख्येमुळे देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 41, 13,811 इतकी झाली आहे. शुक्रवारी देशात 86,432 नवीन रुग्ण आढळले तर 1089 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोना संक्रमणात ब्राझीलला (Brazil) मागे टाकून भारत (India) आता जगात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये चिंता वाढत चालली आहे.