Main Featured

कोल्हापूरकरांनो जनता कर्फ्यूबाबत संभ्रम ..?

Kolhapur News


Kolhapur News-शहरात वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. याला अनेक संघटनांचा विरोध आहे. चेंबर ऑफ कॉमर्सकडूनही बुधवार पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.


कोरोना रुग्णांची (coronavirus) साखळी तोडण्यासाठी शुक्रवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियम, अटी जाहीर केल्या जाणार नाहीत. लोकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूबाबत संभ्रम आहे.पालिकेच्यावतीने मंगळवारी घेतलेल्या बैठकीतही अनेकांनी विरोध केला.हे वाचा


त्यामुळे, जनता कर्फ्यूसाठी सक्ती केली जाणार नाही; पण स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले. प्रशासनाकडून कोणत्याही नियम, अटी जाहीर केलेल्या नाहीत. लॉकडाउन किंवा जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा प्रशासनाकडून काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नियमावली बनवली जात होती. या कर्फ्यूमध्ये(Kolhapur News)मात्र लोकांवर नियम, अटींचे बंधन नसणार आहे. 

या कर्फ्यूला रिक्षा संघटनांसह कामगारांनी विरोध करत, जनता कर्फ्यू पाळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नेमके काय चित्र असणार, हे पाहावे लागणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने काय सुरू किंवा काय बंद राहणार, केएमटी बस सुरू राहणारी की बंद राहणार हे जाहीर केलेले नाही. शासनाने पूर्वी दिलेल्या नियम, अटीनुसार रिक्षा वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यू लोकांना संभ्रमात टाकणारा आहे.