Main Featured

PUBG Ban झाले असले तरी खिलाडी अक्षय कुमार देणार चाहत्यांना Fau-G, काय आहे हा प्रकार, वाचा सविस्तर


                                         After Pubg Ban Akshay kumar FauG An Action Game To Be Launched In October 2020 | PUBG Ban झाले असले तरी खिलाडी अक्षय कुमार देणार चाहत्यांना Fau-G, काय आहे हा प्रकार, वाचा सविस्तर


भारत सरकारने 118 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समध्ये देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग अॅप असलेल्या पबजीवरही बंदी घालण्यात आली आहे. पबजी बंदीच्याच दुसर्‍या दिवशी बॉलिवूडचा 'खिलाडी कुमार' म्हणजेच अक्षय कुमारने गेमरसाठी एक चांगली आनंदाची बातमी दिली आहे. होय, पबजी बंद होणार म्हणून अनेकजण नाराज असतील तर खास त्यांच्यासाठी  लवकरच अक्षय कुमार  FAU:G (फौजी)  हा गेम लॉन्च करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. 


 

Must Read

अक्षय कुमार (Akshay Kumar) च्या मेंटर्सशिप अंतर्गत हे अॅप बनवले जाईल,तसेच हा मल्टीप्लेअर अ‍ॅक्शन गेम असेल. पबजीच्याच पार्श्वभूमिवर बनवण्यात येणारे हे अॅप पूर्णपणे भारतीय असेल. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्याच्या मनात वेगळे स्थान आहे. त्यामुळे आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. म्हणूनच फौजी या गेममधून मिळणा-या  कमाईतील 20 टक्के रक्कम 'वीर ट्रस्ट ऑफ इंडिया'लाही दिली जाणार असल्याचे अक्षयने म्हटले आहे.


पबजी व्यतिरिक्त लूडो ऑल स्टार आणि  वर्ल्ड-लूडो सुपरस्टार या अॅपवरही बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वीदेखील केंद्र सरकारने गलवान घाटी सीमा वादानंतर चीनमधील 106 अॅप्सवर बंदी घातली होती. ज्यामध्ये टिकटॉक, वी-चॅट, यूसी ब्राउजर, यूसी न्यूज सारख्या व्हिडिओ अ‍ॅप्सचा समावेश होता. या चिनीअॅपच्या वापरामुळे देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था इत्यादींसाठी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अशा प्रकारे आतापर्यंत चीनशी संबंधित एकूण 224 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.