Main Featured

पोस्टाची ही योजना करेल तुमचे पैसे दुप्पट

post office investment schemeगुंतवणुकीचा (investment)फायदा नेहमी संकटकाळात होत असतो. मात्र अनेकदा कुठे गुंतवणूक करावी जिथे चांगला रिटर्न मिळेल, असा प्रश्न अनेकांसमोर असतो. पोस्टाच्या काही योजना आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल आणि तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील. पोस्टाच्या अशा काही योजनांपैकी एक आहे- किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra- KVP) योजना. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणुकदाराचा पैसा (investment)सुरक्षित आहे आणि यामध्ये चांगला रिटर्न मिळण्याची हमी देखील आहे. या योजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो.

Must Read

इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार किसान विकास पत्राची मॅच्यूरिटी अवधी 124 महिने आहे. ही एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेमध्ये ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे.
यामध्ये कमीत कमी गुंतवणूक 1000 रूपये तर जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे.

कोण करू शकतात गुंतवणूक?

यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. ज्याची देखरेख पालकाकडून केली जाते. KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल.

व्याजदर

सरकार प्रत्येक तीन महिन्यासाठी व्याजदर निश्चित करते. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजे जून ते सप्टेंबरसाठी 6.9 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील, जर तुम्ही एकरकमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख रुपये मिळतील.
124 महिने या योजनेचा मॅच्यूरिटी पीरिएड आहे. ही योजना इनकम टॅक्स अधिनियम 80सी अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो रिटर्न येईल त्यावर कर द्यावा लागेल. या योजनेमध्ये टीडीएस कपात केली जात नाही.

ट्रान्सफर करण्याची सुविधा

केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित केले जाऊ शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशन सुविधा देखील आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी केले जाते.

ही कागदपत्रे आवश्यक

यासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे