Main Featured

Post Office बचत खात्याच्या नियमात बदल

Post office savings account

सरकारी सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते उघडण्याची आवश्यकता भासणार नाही. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Post office savings account)उघडले आहे तर सरकारी सबसिडी थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये जमा होईल. 


याकरता तुम्हाला केवळ तुमचे आधार कार्ड पोस्टच्या या बचत खात्याशी लिंक करावे लागेल. यानंतर सरकारी सबसिडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर  (DBT)च्या माध्यमातून तुमच्या खात्यात येईल.  पोस्ट ऑफिस विभागाने अशी माहिती दिली आहे की, याकरता ग्राहकांना अर्ज द्यावा लागेल आणि खाते आधार कार्डाशी लिंक करावे लागेल.

Must Read


सरकारने एप्रिल महिन्यात पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) आणि दुसऱ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक कॉमन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म जारी केला होता. आता सरकारने ज्यांचे पोस्टात आधीपासून खाते आहे, त्यांच्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म जारी केला आहे.
हा फॉर्म अ‍ॅप्लिकेशन फॉर लिंकिंग/सीडिंग अँड रिसीव्हिंग डीबीटी बेनिफिट्स इन-टू पीओएसबी अकाऊंट (Application for Linking/Seeding and Receiving DBT Benefits into POSB Account) या नावाने जारी करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून खातेधारक त्यांचे आधार बचत खात्याशी जोडू शकतात. तर ऑफलाइन पद्धतीने लिंक करण्यासाठी आधार डिटेल्स संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत द्यावी लागेल.
आधारशी लिंक करणे जरूरी
पोस्टाच्या सर्क्यूलरच्या मते, पोस्ट ऑफिस बचत खाते (Post office savings account)धारकांना सबसिडीचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या खात्यासंदर्भातील माहिती सरकारी अथॉरिटीला देणे गरजेचे आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खातेधारकांना त्यांच्या खाते क्रमांकाशील आधार क्रमांक लिंक करणे जरूरी नाही आहे.
पण पेन्शन, एलपीजी सबसिडी यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी खाते आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यात आलेल्या बचत खात्यांशी देखील आधार लिंक असणे गरजेचे आहे.
मिनिमम बॅलन्स असणे आवश्यक
पोस्ट ऑफिसने बचत खात्यासंदर्भातील काही नियमात बदल केले आहेत. जर ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्या खात्यातून पैसे कापले जाऊ शकतात.
पोस्टाने बचत खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याची मर्यादा 50 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. जर तुमच्या खात्यामध्ये 500 पेक्षा कमी रक्कम असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पोस्ट ऑफिसकडून 100 रुपये वसूल केले जातील. दरवर्षी असे करण्यात येईल. जर तुमच्या खात्यामध्ये झिरो बॅलेन्स असेल तर तुमचे खाते बंद केले जाईल. सध्या पोस्टात व्यक्तिगत/संयुक्त खात्यांवर दरवर्षी 4 टक्के व्याज देते.